भाग ३ – प्रयत्ने वाळू चे कण रगडीता !!! Stock Market हि कळे

कुठे होते मी गेल्या आठवड्यात ? hmmm आठवलं.. ४० वर्षाची मी , २० एक वर्षांनी नोकरी शोधायला निघालेली.. बरोबर … तिथेच होते मी..  आपल्या ला जे येतंय त्याचा उपयोग, कष्ट ला साजेसं उत्पन्न आणि वयाची अट नाही  असं काही तरी करावं हा विचार..

आता तुम्हाला मी असंही सांगू शकते कि मी फार विचार केला आणि मग मला कळलं कि share मार्केट हाच माझ्या मुक्तीचा मार्ग 🙂 . पण असं नाहीये.. असतं तर फार छान पण नाहीये .. काही वेळा तुम्हाला कळत नकळत तुमच्या ध्येया कडे देव तुम्हाला घेवून जात असतो. तसच काही तरी माझं झालं.

माझे यजमान ( त्या कळत नवऱ्याला असच म्हणायचो आम्ही ) बँकेत काम करायचे, म्हणजे अजूनही करतात 🙂 . त्या कळत त्यांचं office BSC च्या जवळ होतं. office मध्ये stock मार्केट ची चर्चा होत असते. रस्त्या वर share चे forms ठेवलेले असायचे आणि आपण पण थोडी फार गुंतवणूक करावी अशा विचारानी त्यांनी काही forms भरले. भरले म्हणजे अगदी भरून पावले 🙂 .

सांगायचा अर्थ असा, कि Share तर हातात आले पण त्यांचं करायचं काय याची फारशी कल्पना नव्हती. आणि अश्या रिती ने आमच्या घरी share certificates ची  रद्दी जमा झाली. म्हणजे त्या काळी तरी मी त्याला रद्दीच म्हणायची. त्याला एक कारण होतं, मला कळायचा नाही कि याचा उपयोग काय आणि कधी, घरातल्या इतक्या गोष्टीं बरोबर अजून एक सांभाळा !!! पण तेव्हा मला कल्पना नव्हती कि हीच रद्दी मला माझ्या नशिबाची किल्ली देणार आहे.

चला आता परत २००२ सालात जावूया. असा विचार करा, कि नोकरी शोधून कंटाळलेली मी आणि माझ्या समोर पडलेली हि रद्दी. नोकरी मिळणं कठीण होतं आणि व्यवसाय करायचा म्हणजे भांडवल हवं. त्या वेळी आमच्या गृहिणींची एक सवय उपयोगायला आली. काहीही नवीन जेवण करण्या आधी आम्ही आधी घरात काय काय आहे ते बघतो आणि मगच बाहेरून काय लागेल ते आणायला जातो. मी पण तेच केलं.

ठरवलं कि ह्या रद्दी चा उपयोग करायचा आणि भांडवल उभं करायचं. पैसे तसे हि अडकलेलेच होते आणि certificates घरी पडूनच होती. Share विकले नाहीत तर हातात फ़क़्त रद्दी राहणार होती आणि ब्रोकर तर्फे विकले तर तो २०% घेणार असं सगळ्यांनी सांगितलं. झाला तर फायदा आणि नाही तर नाही. गुंतवणूक होती ती फ़क़्त माझ्या मेहेनती ची. गेल्या १० वर्षात जे काही केलं ते सगळं इथे सुरु झालं.

पुढचं सगळं सांगणारच आहे पण ते पुढच्या आठवड्यात .. येते आता , नंतर भेटूच ..

पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

This entry was posted in Uncategorized and tagged , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

13 thoughts on “भाग ३ – प्रयत्ने वाळू चे कण रगडीता !!! Stock Market हि कळे

 1. पिंगबॅक निजरूप दाखवा हो.. हरी दर्शनास या हो !!! « Stock Market आणि मी

 2. पिंगबॅक भाव तिथे देव… पण कुठला भाव आणि कुठला देव « Stock Market आणि मी

 3. पिंगबॅक भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी

 4. पिंगबॅक भाग १५ – भाव तिथे देव… पण कुठला भाव आणि कुठला देव | Stock Market आणि मी

 5. पिंगबॅक भाग २ – केल्याने होत आहे रे.. आधी केलेची पाहिजे.. | Stock Market आणि मी

 6. siddharth

  madam mi pan thakla..bhglela ..marathi mulga…family chi responsbility purn karnyat career thambal…ani aata job chya mage…pan 2 varshacha gap aslyane…package khup kami ..tyamulhe…internet var shares baddal mahiti ghetoy..ani kharach ithun pudhe jas me vachat hayin tas…majh knowledge vadhnar ahe ani mala ek navin sanjeevani milhel as valayala lagal ahe…

  1. surendraphatak

   वाचन करून तुम्ही शेअरमार्केट्ची माहिती मिळवत आहांत, इंटरनेट वरून शेअर मार्केट्ची माहिती मिळवत आहांत हे समजल्यामुळे आनंद झाला. परंतु कधी ना कधी तुम्हाला धैर्य करून हळूहळू मार्केटमध्ये व्यवहार करावा लागेल. अर्थात सावधगिरी कायमच बाळगावी लागते. मैदानाबाहेर उभे राहून नियम समजावून घेवून खेळ समजतो करमणूक होते, पण स्वतःला खेळता येत नाही. सातत्याने माहिती तर मिळवायची आणी मिळालेल्या माहितीचा उपयोग करून जास्तीतजास्त उत्पन्न मिळवायचे असे केल्यास तुमच्या उत्पनांत वाढ होईल व तूमची अडचण थोड्या फार प्रमाणांत कमी होईल. तुमच्या शेअरमार्केटमधील भावी करिअरसाठी शुभेच्छा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s