Tag Archives: Euro

भाग ३२ – dayट्रेडचं वेड !!

आज रविवार ! सकाळीच फोन आला – ‘ओळखा पाहू कोण बोलतो आहे ते’

मी म्हणाले ‘मला ओळखू येत नाही.. माफ करा’

‘ अहो बाई माफी कसली मागता, मी विद्यार्थी तुमचा. १०वर्षापूर्वी तुमच्याकडे गाण्याच्या क्लासला येत होतो. मी तुमचा ब्लोग वाचला आणि विचार केला कि फोन करावा. मला शेअर्स विषयी माहिती हवी आहे. तुम्हाला वेळ आहे का तर ४ वाजता भेटायला येवू का ?’

‘अवश्य या’ अस सांगून मी फोन ठेवला . नोट विद्यार्थी आणि त्यांचे तीन  मित्र असे चौघेजण दुपारी आले .थोड्या गप्पा झाल्या .

मीच मुद्द्याला हात घातला – ‘बोला काय हवय?’

‘मार्केटमध्ये थोडेसे पैसे गुंतवून ,थोडासा धोका पत्करून आम्हाला थोडी कमाई व्हावी असा काहीतरी विचार आहे. आमचा थोडासा वेळही जायला हवा आणि  आमचे जे खाजगी आणी वैयक्तिक खर्च निघतील इतके पैसे सुटायला हवेत. याबाबतीत तुम्ही काही सल्ला देवू शकाल का?’

‘तुम्ही तुमच्या ब्लोग वर सांगता कि मार्केटचा अभ्यास करायला हवा. आता आमचा थोडा प्रोब्लेम असा आहे कि जेव्हा अभ्यास करायला हवा होता तेव्हा केला नाही आता काय अभ्यास करणार आम्ही! नंन्नाचीच बाराखडी समजा. तस आम्ही आवश्यक ते अकौंट उघडलेत.’

मी मनातल्या मनात हसले आणि मग त्यांच्याशी बोलायला सुरवात केली

‘तुमची समस्या समजली . तुम्ही त्याला अभ्यास म्हणा किवा समजून घेणे म्हणा काहीही फरक पडत नाही. जर लोकलने कुठे जायचे असेल तर स्टेशन कुठे आहे , गाडी किती नंबर फलाटावर लागते , fast आहे स्लो आहे, तिकीट कुठे मिळतं हे जस समजावून घेता तसच आहे मार्केट.

१५ दिवस मार्केटकडे लक्ष ठेवा. मार्केट मधल्या ब्लू चीप शेअर्सच्या भावाकडे लक्ष्य द्या. त्यापैकी कोणता  शेअर वाढतो आहे, कोणता पडतो आहे, किती रुपयाच्या फरकाने वाढतो किवा पडतो आणि का वाढतो किंवा पडतो त्याची कारणे शोधा . जो शेअर विनाकारण पडत असेल तो शेअर घ्या . शेअर्सची संख्या कमी किवा तुमच्या गुंतवणुकीच्या अंदाजपत्रकाप्रमाणे ठेवा . शेअरच्या किमतीत दलाली  कर  इत्यादी मिळवा थोडाफार फायदा मिळत असेल तर लगेच विकून  टाका . सुरुवातीला जास्त फायदा मिळवण्याच्या भानगडीत पडू नका . अन्यथा मुद्दल गमावून बसाल.

madam माझे दोघे तिघे ओळखीचे आहेत त्यांच्या ऑफिसच्याजवळच शेअर ब्रोकरचे ऑफिस आहे . त्याना मध्यॆ २ तास फ्री असतात . त्यानी त्याच ब्रोकरकडे अकौंट उघडले  आहेत ते डबे तेथेच खातात . ट्रेडिंग करतात. पुन्हा ऑफिसमध्ये येवून काम करतात . आणि ऑफिस सुटले की घरी जातात . पण सांगायचे कारण म्हणजे त्या २ तासातही २०० ते ४०० रुपये मिळतात असे म्हणत होते. मग हे कस काय?

मला मनातल्या मनात अजून हसू आलं. याच प्रश्नाची वाट मी बघत होते

‘हे पहा तुम्ही कधी शेअर्स खरेदी करावे आणी कधी शेअर्स विकावे याला  मार्केटच्या वेळेव्यतिरिक्त  काहीच बंधन नसते .शेअर्सची खरेदी आणी विक्री त्याच दिवशी झाली तर दलाली कमी बसते. यालाच मार्केटच्या भाषेत “INTRA -DAY ” ट्रेड असे म्हणतात.’ ( हा काय प्रकार असतो ते नंतर तुम्हाला सांगेनच)

तुम्ही तुमच्या मित्रांना विचार कि ” त्यांना कधी घाटा  होतच  नाही का ?   कारण प्रत्येक माणूस काळी बाजू कधी सांगत नाही.’

‘ कधी घाटा होतो कधी फायदा होतो. रोज सकाळी तुम्ही कामाला जाता. एखाद्या दिवशी तुम्ही धावत बस पकडता, रस्ता पटकन क्रॉस करता आणि फलाटावर गाडी उभीच असते, त्यामुळे तुम्ही वेळेवर आणी त्रास न होता पोहोचलता. पण असं रोज होतं का? घाईमध्ये पाय सरकतो आणि एखाद्यावेळी तुम्ही पडतासुद्धा. ज्या दिवशी पडता त्यादिवशी ते सगळ्यांना सांगता का? सांगा बघू!

तुम्हाला लाटेवर स्वार होऊन पलीकडच्या किनारयाला जायचं असेल, पण लाट मध्येच विरली तर बुडण्याचा धोका असतो. मार्केटचं पण तसच आहे. कोणत्याही व्यवसायात घाटा होतोच पण तो कमी कसा होईल याची खबरदारी घ्यावी लागते. साठी तुम्ही टी व्ही समोर किंवा ब्रोकरच्या ऑफिसात BOLT समोर असला पाहिजेत . मार्केटच्या वेळात एखादी चांगली बातमी आली तर बातमीशी संबधित असलेले शेअर्सच्या किमती वाढण्याची शक्यता असते . शेअरची किमत वाढण्यास सुरुवात झाली की तो लगेच विकत घ्यायचा आणी किमत १-२रुपयांनी वाढली की तो विकून  टाकायचा. जर खराब बातमी आली आणी  शेअर्सची किमत कमी व्हायला लागली की तो प्रथम विकायचा आणी नंतर  विक्रीच्या भावापेक्षा कमी भावात खरेदी  करायचे . पण ते असतं मार्केट ! ते आपल्या आज्ञेनुसार किवा आपल्याला हव तस वागत नाही .

अहो आजकाल आपली मुले, बायको तरी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागतात का? नाही ना? मग मार्केटकडून काय अपेक्षा ठेवणार . रोज intra -day ट्रेड करून काही लोकांना मार्केटची सवय होते. हळू हळू मार्केट थोडं थोडं कळायला लागत. आणि मग थोडे थोडे दुध भाजीचे पैसे सुटायला लागतात. त्यामुळे लोक जसा महिन्याचा हिशेब ठेवतात तसा ठेवून महिनाखेर किती पैसे मिळतात ते पहा.करून पहा आणी सांगा मला काय होते ते.’

त्यापुढे मी त्यांना जे सांगितल ते तुम्हाला पण सांगते.  Day-trade करताना काही गोष्टी लक्षात ठेवा

  • जे काही कराल ते एका प्रमाणात करा. ५ किंवा १० शेअरपासून सुरवात करा आणि जोपर्यंत आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत तिथेच थांबा.
  • तुम्ही किती नुकसान सहन करू शकता हे ठरवा आणि तुमचा व्यवहार त्या हिशोबानी करा
  • Day-trade सुरवातीला ब्लू चीप शेअर मधेच करा. जर शेअर विकता आले नाहीत तर ब्लू चीप शेअर तरी हातात येती.ल
  • जोपर्यंत तुम्हाला Day-trade पूर्णपणे कळत नाही तोपर्यंत फार रिस्क घेवू नका

काही मदत लागली तर मी आहेच. बोलूच लवकर..

पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा